काळाने सर्वांना बदलवले, तसा बापही बदलला. आता कुटुंबात बापाची दहशत तेवढी उरलेली नाही, कारण आताचा बाप हा मुलांचा पहिला बेस्ट फ्रेंड झालेला आहे. आता बापाच्या मायेत जास्तीचा ओलावा दाटलेला जाणवतो. आपल्या लेकरांसोबत बापही लेकरू होऊन जगताना दिसतो आणि कधीतरी कोपर्यात, एकांतात आपल्याच लेकराच्या काळजीपोटी मनातून गहिरवलेला बाप लेकरू झालेला आढळतो. अल्लड, अपरिपक्व, थोडासा बेपरवाह म्हटला जाणारा नवरा/पुरुष जेव्हा बाप होतो ना तेव्हा त्याला कधीही सांगावे लागत नाही की आता तू बाप झालास आणि जबाबदारीने वाग, तो आपसूकच जबाबदार झालेला असतो.
लेकरांवर स्वतःचे आयुष्य ओवाळून टाकणारा बाप स्वतःसाठी जगायला विसरलेला असतो. अर्थात चाकोरीबाहेरचे जगणे बापाला शक्य नसते असे नाही. तो क्षणभर जरी त्याच्या जबाबदार्या विसरला किंवा कुठे घसरला तर त्याच्या कुटुंबाची वाताहत होणार याचे भान तो ठेवून असतो. जो हे भान विसरला त्याच्या कुटुंबाची परवड ठरलेली असते. त्याच्यावर निर्भर असलेले कुटुंब समर्थपणे उज्वल भविष्याकडे नेण्याचे काम बाप चोखपणे करत असतो; तेही अगदी निमूटपणे.
म्हणूनच की काय ‘बाप बाप असतो’ संयमाचं गाठोडं घेऊन तो जगत असतो. त्याची माय गेल्यावर आतून एकाकी झालेला तरीही व्यक्त न होणारा आणि आपल्या मुलांची आई गेल्यावर मुलांसाठी झुरणारा बापही अनेकदा बघायला मिळतो. फक्त समाजव्यवस्थेने त्याला बाप नावाचे चिलखत घातले असल्याने त्याच्यातला हळवा माणूस दुर्लक्षित होऊन जातो. मुलाचे जोडे बापाच्या पायात यायला लागल्यावर स्वतःचा रेपलिका बघून आतूनच सुखावणारा बाप मूल चुकल्यावर त्याच जोड्याने मारायला कमी करत नाही. त्यामुळेच बापाची आदरयुक्त भीती आजही कुटुंबात शाश्वत आहे. बाप एक असे न्यायालय आहे जिथे सर्व गुन्हे माफ केले जात नाहीत. म्हणूनच लेकरांच्या अनेक चुकांची नोंद बापापर्यंत पोहोचू न देणारी आई आपल्या मुलांना शिक्षेपासून वाचवत असते.
बाप हा खूप काही करत असतो रक्ताच पाणी करतो आपल्या पोरांसाठी रातदिन झटत असतो मुलांना शाळेत टाकण्यापासून तर त्यांच्या लग्नापर्यंत सर्व आर्थिक भार तो एकटा उचलत असतो
याच बापासाठी आपल्या मुलांच्या शिक्षणासठी मुलीच्या विवाहासाठी मुलाला बिझनेस साठी पैसे एका रात्रीत कुठून आणून देणार म्हणून अशा सर्व माझ्या बापांसाठी हीच ती वेळ आहे आपण खूप कष्ट करत आहोत पण कमावलेल्या पैशात तर खर्चच तर जास्त होतोय . म्हणून आताच थोडीशी बचत करायला तयार हो . . .
हा आता प्रश्न पडला असेल कुठे गुंतवणूक करून मुलांचे भविष्य सुरक्षित करू तर काळजी कशाला मी आहे ना तुमचा आर्थिक सल्लगार तुमच्या बचतीच्या सुरुवातीचा पाया .
अहो लांब कशाला मी येथेच असतो आपल्या गावातील HDFC BANK नांदूर शिंगोटे शाखेत मी तुमच्यासाठी सदैव उपलब्ध आहे
विकास लाड .
8530930497
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा