प्रार्थना - असो तुला देवा । माझा सदा नमस्कार । - साने गुरुजी

असो तुला देवा । माझा सदा नमस्कार ।
तुझ्या दया-मातृत्वाला अंत नाही पार ।

तुझ्या कृपेने रे होतिल फुले फत्तराची
तुझ्या कृपेने रे होतिल मोती मृत्तिकेची
तुझ्या कृपेने रे होतिल सर्व रम्य हार

असो तुला देवा । माझा सदा नमस्कार ॥

तुझ्या कृपेने रे होईल उषा त्या निशेची
तुझ्या कृपेने रे होईल सुधा त्या विषाची
तुझ्या कृपेने रे होईल पंगु सिंधुपार

असो तुला देवा । माझा सदा नमस्कार ॥


तुझ्या कृपासिंधू मधला बिंदू जरी मिळेल 
तरी प्रभो! शतजन्माची मतृषा शमेल
तुझे म्हणुनन आलो राया । बघत बघत दार

असो तुला देवा । माझा सदा नमस्कार ॥

- साने गुरुजी 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीन लेख

कुठे गुंतवणूक करून मुलांचे भविष्य सुरक्षित करू

काळाने सर्वांना बदलवले, तसा बापही बदलला. आता कुटुंबात बापाची दहशत तेवढी उरलेली नाही, कारण आताचा बाप हा मुलांचा पहिला बेस्ट फ्रेंड झालेला आहे...

सर्वाधिक पसंतीस असलेले लेख :