छत्रपती सिंहासनीची एक राणी ताराबाई
कोल्हापूरची जगदंबा महाराष्ट्राची अंबाई
शत्रूवर घाली छापा काळ तयाची ती होई
जेरीस शत्रूला करून करी बेफाम चढाई
न्हाऊन टाकी रणभूमी
शत्रू रक्तानी सारी
चपळता विजेची जैसी
तशीच कडाडे संहारी
हि एकच शूर रणगाजी छत्रपती ताराबाई
शिवधनु प्रतापी माझी वीरांची रणदेवाई
जयभवानी जयजयकार जय ताराराणी ललकार
तिज करी मी नमस्कार शूर देवीचा जयजयकार
कोल्हापूरची महान राणी
छत्रपती शोभते भूषणी
शुभहस्ते तलवार भवानी
ताराबाई असुरमर्दिनी
ताराबाई माझी मर्दिनी
भासे चंडिका रणांगणी
रणदेवी ती श्रद्धास्थानी
नमन माझिये तिचिया चरणी
----------
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
" काव्यफुले " या
काव्यसंग्रहातून सादर
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी आपल्या काव्यफुले या काव्य संग्रहात इतिहास विषयक फक्त २ कविता रचलेल्या असून त्यापैकी एक हि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावर आधारित आहे
महाराणी ताराबाई यांचे चरित्र चा
सावित्रीबाई फुले यांच्या वर खूप प्रेंरकसंस्कार
करून गेला होता त्यामुळे सावित्रीबाई
आपल्या आदर्श मध्ये
राणी छत्रपती ताराबाई
यांना महत्वाचे स्थान दिलेले
या काव्यातून जाणवते .
विकास लाड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा