माता मृत्यूदर कमी करण्यात महाराष्ट्र देशात द्वितीय

  • महाराष्ट्राच्या माता मृत्यूदरात सातने घट
  • माता मृत्यूदर कमी करण्यात महाराष्ट्राने देशभरात द्वितीय क्रमांक मिळविला असून त्याची दखल घेत दिल्ली येथे झालेल्या सोहळ्यात केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते महाराष्ट्राला पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
  • राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
  • माता मृत्यूदर कमी करण्यात केरळ देशात प्रथम असून त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक आहे. तर,
  • तिसऱ्या क्रमांकावर तमिळनाडू राज्य आहे.
  • जागतिक आरोग्य संघटनेने भारताला २०३० पर्यंत माता मृत्यूदर कमी करून ७० वर आणण्याचे उद्दिष्ट दिले असून महाराष्ट्राने २०१८ मध्येच हे उद्दिष्ट साध्य करत माता मृत्यूदर ६८ वरून ६१ वर आणण्यात राज्याला यश मिळाले आहे.
  • या कामी प्रयत्न केलेल्या आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, वैद्यकीय अधिकारी यांचे अभिनंदन करीत या कामी अधिक यश मिळवून माता मृत्यूदर अजून कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले.
  • पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानामध्ये महाराष्ट्र प्रथम या अभियानांतर्गत असलेल्या संकेतस्थळावर खासगी तसेच सरकारी डॉक्टर यांची नावे नोंदवावी लागतात. या संकेतस्थळावर देशभरातील जवळपास पाच हजार डॉक्टरांनी नावे नोंदविली आहेत. त्यापैकी महाराष्ट्रातून सर्वाधिक ६०० डॉक्टरांचा समावेश आहे. दर महिन्याच्या ९ तारखेला मातृत्व अभियानांतर्गत डॉक्टर आपल्या सेवा देतात.त्यासाठी महाराष्ट्राला पुरस्कृत करण्यात आले. हा पुरस्कार आरोग्य विभागाचे सचिव प्रदिप व्यास यांनी स्वीकारला. महाराष्ट्रात हे अभियान केंद्र सरकारने सुरू करण्याच्या पूर्वीपासून लागू केलेले होते. या अंतर्गत गर्भवती महिलांची सोनोग्राफी करण्यात येते. यासह अॅनिमियाग्रस्त गर्भवती महिलांना आयर्नचे इंजेक्शन दिले जाते. याचा सकारात्मक परिणाम महिलांच्या प्रसूती दरम्यान दिसून आलेला आहे.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
*राजमुद्रा अकॅडमी...मोहर राजपथाच्य यशाची*
*संचालक*
*श्री. विकास देविदास लाड*
*गुरु गोरक्षनाथ सभागृह*
*महात्मा फुले कॉलेज समोर, संगमनेर नाका, सिन्नर-शिर्डी महामार्ग.*
*सिन्नर जि. नाशिक.*
*मोबा - ८५३०९३०४९७.*
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺


जॉईन व्हा

टेलिग्राम - 
https://t.me/rajmudransk

whatsapp - 8530930497


Website :- https://rajmudransk.wordpress.com


Blog :- https://rajmudransk.blogspot.com

twitter : https://twitter.com/vikylad

fb page : fb.com/rajmudransk

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीन लेख

कुठे गुंतवणूक करून मुलांचे भविष्य सुरक्षित करू

काळाने सर्वांना बदलवले, तसा बापही बदलला. आता कुटुंबात बापाची दहशत तेवढी उरलेली नाही, कारण आताचा बाप हा मुलांचा पहिला बेस्ट फ्रेंड झालेला आहे...

सर्वाधिक पसंतीस असलेले लेख :