स्वरचित कविता - द्वंद्व मनाचे

मनीचे भाव न उमटे ओठी

अंतराची जान अंतरीच वसे 

उमजे न मज करावे काय 

अंतरीचे द्वंद्व अंतरात युध्द असे

करावे काय न करावे काय 

एकची मंत्र सोबती असे 

मानावे सत्य परि एकची जान 

रमावे मनी घेता गुरु एक नाम 

भेदाभेद द्यावा सोडुनी मज सांग 

उमजे परि गुरु एक साध्य

व्हावे शरणागत तया 

अर्पुणिया मना 

हेचि एक मज कळिले अंतरी 

मुखी गुरू नाम सदा वसे 

अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त   

-
विकास लाड 
रचना 07 सप्टें 2019

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीन लेख

कुठे गुंतवणूक करून मुलांचे भविष्य सुरक्षित करू

काळाने सर्वांना बदलवले, तसा बापही बदलला. आता कुटुंबात बापाची दहशत तेवढी उरलेली नाही, कारण आताचा बाप हा मुलांचा पहिला बेस्ट फ्रेंड झालेला आहे...

सर्वाधिक पसंतीस असलेले लेख :