|| जय जिजाऊ , जय शिवराय ||

आज आमच्या घराबाहेर काही लहान मुले खेळत होती. साधारणतः ६ ते ७ वर्षांची आहेत , खेळतांना "|| जय भवानी || जय शिवाजी || " असा एकेरी नावाने जोरजोरात जयघोष करत होती .
यात त्यांचा काही दोष नाही त्यांना उत्तेजन देणारे आपले बहुजनच आहेत .
मी नुकताच कामावरून येत होतो  घरात प्रवेश करत होतो आणि त्या मुलांचा अखंड जयघोष चालू होता.
मी दारातच थांबून त्या मुलांना माझ्या जवळ बोलावून चोकलेट चे आमिष दाखवून त्यांना
समजावून सांगितले कि शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत . तुम्ही जो खेळ खेळत आहात त्यात फक्त एक बदल करा . . . . 

मुले उत्साहाने काहीतरी नवीन सांगत आहे यामुळे लक्ष देवून ऐकायला लागली . . .
"|| जय भवानी जय शिवाजी ||" या ऐवजी " || जय जिजाऊ , जय शिवराय || " असे म्हणा . . .

मुले आनंदाने नवीन बदल ऐकून तसे उच्चार करू लागली आणि खेळायला गेली. . . .
आपण आपल्या पाल्यांना सभोवतालच्या चिल्ल्या -पाल्यांना प्रेमात आणि थोडक्यात काही गोष्टी समजावून सांगितल्या तर निरागस मनाच्या मुलांवर आपण नक्कीच परिवर्तन घडवू शकतो . . .
हा माझा छोटा प्रयोग यशस्वी झाला . . . समाधान आहे

 अजून खूप परिवर्तन करायचे आहे म्हणून लहान मुलांवर हि चांगले संस्कार व्हायला हवेत . .


शिवश्री विकास वंदना देविदास लाड
शिवसंघ प्रतिष्ठान नाशिक
९७६४९७०४९७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीन लेख

कुठे गुंतवणूक करून मुलांचे भविष्य सुरक्षित करू

काळाने सर्वांना बदलवले, तसा बापही बदलला. आता कुटुंबात बापाची दहशत तेवढी उरलेली नाही, कारण आताचा बाप हा मुलांचा पहिला बेस्ट फ्रेंड झालेला आहे...

सर्वाधिक पसंतीस असलेले लेख :