👮🏻♂ पोलीस भरती ! All Information👇🏻👇🏻👇🏻
◾️उमेदवारांनी पोलीस शिपाई भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता, वयाची अट, शारीरिक क्षमता चाचणी, लेखी परीक्षा वगैरेची माहिती करून घ्यावी त्याप्रमाणे पूर्वतयारी करावी.
पोलीस भरतीसाठी इयत्ता 12 वीची बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उंची 165 सें.मी. पेक्षा कमी नसावी. (महिलांसाठी 155 सें.मी.) वयोमर्यादा ही 18 ते 28 वर्षे आहे. (मागासवर्गीयांसाठी 18 ते 33 वर्षे आहे.)
पोलीस भरतीमधील विविध टप्पे :
1) शारीरिक पात्रता :
प्रथम उमेदवारांची उंची/छाती/वजन मोजण्यात येते.
2) प्रमाणपत्रांची तपासणी- शैक्षणिक प्रमाणपत्रे उदा. 10 वी, 12 वी, पदवी गुणपत्रक, वयाच्या पुराव्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला. जात प्रमाणपत्र, ओबीसी एनटीसी, एनटीडीचे नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र, महाराष्ट्राचा रहिवासी दाखला, चार फोटो, एम्प्लॉयमेंट कार्ड, इतर प्रमाणपत्रे उदा. खेळाडू, एनसीसी, होमगार्ड, वाहन परवाना, टायपिंगचे ज्ञान, कॉम्प्युटर ज्ञान वगैरे.
3) मैदानी परीक्षा – 100 गुण
4) लेखी परीक्षा – 100 गुण
पोलीसभरतीची शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता, शारीरिक क्षमता चाचणी, लेखी परीक्षेची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे
पोलीस शिपाई –
1) वेतनश्रेणी– रुपये 5,200-20,200 (ग्रेड पे 2,000)+500 विशेष वेतन व इतर देय भत्ते.
2) शैक्षणिक पात्रता (पोलीस शिपाईसाठी)– अ) इयत्ता 12 वी उत्तीर्ण किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्क आहे (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनियर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत). ब) माजी सैनिक 15 वर्षे सैनिकी सेवा पूर्ण असणाऱ्यांच्या बाबतीत नागरी परीक्षा इयत्ता 10 वी उत्तीर्ण किंवा IASC (Indian Army Special Certificate Of Education) प्रमाणपत्र व 15 वर्षे सैनिकी सेवा पूर्ण नसलेल्यांच्या बाबतीत इयत्ता 12 वी परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
शैक्षणिक पात्रता (बॅंड पथकासाठी)– अ) इयत्ता 10 वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अनुभव व इतर अटी (बॅंड पथकासाठी) – बॅंड पथकातील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना बॅंड पथकातील वाद्यांची माहिती असणे व वाद्य वाजविण्याचा अनुभव असणे आवश्यक राहील. पोलीस बॅंड पथकासाठी निवड करण्यात आलेले उमेदवार कार्यकारी शाखेत बदलीसाठी पात्र असणार नाहीत मात्र हे उमेदवार जिल्ह्याच्या बाहेर फक्त इतर पोलीस घटकातील बॅंड पथकात बदलीस पात्र ठरतील.
3) शारीरिक पात्रता –
पुरुष उमेदवारांकरिता – अ) उंची 165 सें.मी. पेक्षा कमी नसावी. ब) छाती न फुगवता 79 से.मी.पेक्षा कमी नसावी व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक 5 सें.मी. पेक्षा कमी नसावा. (खेळाडू उमेदवारांसाठी सूचना- पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियम 2011 नुसार आवश्यक पात्रतेच्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या पुरुष व महिला खेळाडूंना किमान उंचीच्या अटीमध्ये 2.5 सें.मी. इतकी सूट राहील.)
नक्षलग्रस्त भागासाठी विशेष तरतुदी, खेळाच्या प्रवर्गाकरिता उंचीमधील सूट व पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्याबाबत अनुज्ञेय असलेली सूट mahapolice.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
# उमेदवारांकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) असणे आवश्यक आहे.
सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापूर्वी उमेदवारांनी प्राप्त करून घेणे आवश्यक आहे.
4) शारीरिक चाचणी :- पोलीस शिपाई पदासाठी आवेदन अर्ज सादर केलेले व शारीरिक मोजमापात पात्र ठरलेल्या उमेदवारांची सेवा प्रवेश नियमांतील तरतुदींनुसार कागदपत्र पडताळणीतील पात्रतेच्या अधिन राहून 100 गुणांची शारीरिक चाचणी घेण्यात येईल. माजी सैनिकांना शारीरिक चाचणीत देण्यात येणाऱ्या सवलतींचा सविस्तर तपशील mahapolice.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
5) लेखी परीक्षा :- जे उमेदवार शारीरिक चाचणीत किमान 50 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण होतील, त्यापैकी जाहिरातीत प्रवर्गनिहाय नमूद केलेल्या पदसंस्खेच्या 1ः15 या प्रमाणात गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांना लेखी परीक्षेला कॉल केले जाईल. लेखी परीक्षा 100 गुणांची असेल त्यासाठी कालावधी 90 मिनिटांचा असेल व परीक्षा मराठी माध्यमातून घेतली जाईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी/ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे राहतील. लेखी परीक्षेचा
अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे राहील.
1. सामान्यज्ञान/जनरल नॉलेज व चालू घडामोडी
2. अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी
3. मराठी व्याकरण इ.
6) पोलीस भरतीची वेबसाईट :-
mahapolice.mahaonline.gov.in
http://mahapolice.mahaonline.gov.in
8530930497
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा