व्हॉट्स ॲपवरील पदभरतीच्या बोगस जाहिराती;

्हॉट्स ॲपवरील पदभरतीच्या बोगस जाहिराती; फसवणुकीपासून सावध रहावे - शासनाचे स्पष्टीकरणशनिवार, ०३ फेब्रुवारी, २०१८

मुंबईव्हॉट्सॲप या समाज माध्यमावर सध्या सामान्य प्रशासन विभागाच्या दि. 10 जानेवारी 2018 रोजीच्या शासन निर्णयाचा संदर्भ देऊन विविध पदांच्या भरतीबाबत बोगस जाहिरात व्हायरल होत आहे. अशी कोणतीही जाहिरात विभागामार्फत देण्यात आली नाही. तरी अशा बोगस जाहिरातीपासून सावध रहावे आणि आपली फसगत होणार नाही याची उमेदवारांनी काळजी घ्यावी, असे सामान्य प्रशासन विभागाकडून कळविण्यात आले आहे.

विविध व्हॉट्सॲप ग्रुपवर सध्या सामान्य प्रशासन विभागाच्या नावाची लिपिक-34, सहायक रोखपाल-22, रोखपाल-10, लेखापाल-6, गोपनीय लिपिक-19, देयक लेखापाल-14, शिपाई-58, वाहनचालक-34, नाईक-31 अशी 228 पदे सरळसेवेने भरण्याबाबतची जाहिरात फिरत आहे. जाहिरातीवर शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक-अपमु-2917/प्र.क्र.44/19अ, दि. 10 जानेवारी 2018 नमूद केलेला आहे व जाहिरातीखाली स्वाक्षरी केलेल्या अधिकाऱ्याचे पदनामअध्यक्ष निवड समिती तथा उपसचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई’ असे दाखविण्यात आले आहे.

मंत्रालयातील बऱ्याच विभागांकडून, शासकीय कर्मचारी व जनतेकडून दूरध्वनीद्वारे ही जाहिरात खरी आहे काय याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडे विचारणा होत आहे. प्रत्यक्षात समाज माध्यमावर फिरणारी जाहिरात बोगस असून, सामान्य प्रशासन विभागामार्फत अशा प्रकारे पदभरतीसाठी कोणतीही जाहिरात दिलेली नाही. जाहिरातीमधील बहुतांशी सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येतात. अशी जाहिरात शासनाच्या विभागाकडून दिली जात नाही. जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या शासन निर्णयाद्वारे सामान्य प्रशासन विभाग व त्‍या विभागांतर्गत अन्य पाच कार्यालयांच्या आस्थापनेवरील 195 अस्थायी पदांना दि. 28 फेब्रुवारी 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही भरतीची जाहिरात नसून नियमित प्रशासकीय बाबीसंबंधीचा शासन निर्णय आहे, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.

'महान्यूजमधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.

➖➖➖➖➖➖➖➖➖
महाराष्ट्र शासनाच्या *अचूक, वस्तुनिष्ठ आणि अधिकृत* माहितीसाठी आजच _*फॉलो*_ करा..

■ महान्यूज - goo.gl/jeSJ9C

■ फेसबुक - goo.gl/usr4U7

■ ट्विटर - goo.gl/sbytXX

■ टेलिग्राम- t.me/MahaDGIPR

■ युट्युब- goo.gl/ypn0PN

■ ब्लॉग - goo.gl/9QVTSt

■ इन्स्टाग्राम - goo.gl/i7DPTd

https://www.mahanews.gov.in/Home/MantralayNewsDetails.aspx?str=yL+cbm10d4TtY5NoYD+T9g==

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीन लेख

कुठे गुंतवणूक करून मुलांचे भविष्य सुरक्षित करू

काळाने सर्वांना बदलवले, तसा बापही बदलला. आता कुटुंबात बापाची दहशत तेवढी उरलेली नाही, कारण आताचा बाप हा मुलांचा पहिला बेस्ट फ्रेंड झालेला आहे...

सर्वाधिक पसंतीस असलेले लेख :