संक्रांत विविध प्रादेशिक नावे


प्रस्तावना  :-

मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेतीसंबंधित सण आहे.
 सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते. या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. 
या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. 
पृथ्वीवरूनन पाहिले असता, सूर्याच्या उगविण्याची जागा या दिवसापासून दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते.

उत्तरायण' शब्द, दोन संस्कृत शब्द उत्तर (उत्तर दिशा) व अयन (अंतराळातील मार्ग) या शब्दांचा संधी आहे.


विविध प्रादेशिक नावे : -

उतर भारतात -
  • हिमाचल प्रदेश - लोहडी अथवा लोहळी, (Lohri)
  • पंजाब - लोहडी अथवा लोहळी, (Lohri)
    • पंजाब , हरियाणा या भागात १३ जानेवारी या दिवशी लोहारी सण साजरा केला जातो.संध्याकाळच्या शेकोटी साठी छोटी मुले घरोघरी जावून गाणी म्हणतात व शोकोटीसाठी लाकडे वा पैसे गोळा करतात.शेकोटी पेटल्यावर त्यात उसाचे पेर, तांदूळ , तीळ टाकतात.हिवाळ्यातील हा सर्वात थंड दिवस असतो. या दिवशी लोहारीच्या देवीची पूजा केले जाते.
पूर्व भारतात - 
  • बिहार - संक्रान्ति
  • आसाम - भोगाली बिहु, (Bhogali Bihu)
  • पश्चिम बंगाल - मकर संक्रान्ति
  • ओडिशा - मकर संक्रान्ति
पश्चिम भारतात -
  • गुजरात व राजस्थान - उतरायण (पतंगनो तहेवार) (पतंगांचा सण)
    • गुजरातमध्ये या दिवशी धान्य,तळलेल्या मठिया, खाद्यपदार्थ बनवले व दान केले जातात. 
  • महाराष्ट्र - मकरसंक्रांत
दक्षिण भारतात -
  • कर्नाटक, आंध्र प्रदेश - (संक्रांति)
  • तमिळनाडू - पोंगल, (Pongal)
      • दक्षिण भारतात पोंगल सण ३ दिवस साजरा होतो. भोगी पोंगल या दिवशी होळी पेटवून त्यात घरातील अनावश्यक वस्तू टाकतात. मुली त्या होळीभोवती फेर धरून नाचतात.सूर्य पोंगल या दिवशी तांदूळ, गुळ, दुध यांची खीर करून तिचा नैवेद्य दाखवितात.मुडू किंवा कननु पोंगल या दिवशी गोठ्यातील जनावरांची पूजा केली जाते.याच दिवशी भावाच्या चांगल्या आयुष्यासाठी बहिणी पूजा करतात व भावाला ओवाळतात.
      • शबरीमाला मंदिरात मकर वल्लाकु उत्सव.

नेपाळमध्ये - थारू (Tharu) लोक - माघी

थायलंड - सोंग्क्रान (Songkran)

लाओस - पि मा लाओ (Pi Ma Lao)
म्यानमार - थिंगयान (Thingyan)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीन लेख

कुठे गुंतवणूक करून मुलांचे भविष्य सुरक्षित करू

काळाने सर्वांना बदलवले, तसा बापही बदलला. आता कुटुंबात बापाची दहशत तेवढी उरलेली नाही, कारण आताचा बाप हा मुलांचा पहिला बेस्ट फ्रेंड झालेला आहे...

सर्वाधिक पसंतीस असलेले लेख :