जिजाऊ वंदना


जिजाऊ वंदना

जिजा माउली गे , तुला वंदना हि|
तुझ्या प्रेरणेने , दिशा मुक्त दाही ||१||

भयातून मुक्ती , मिळाली जनांना |
गुलामी कुणाला, कुणाचीच नाही ||२||

नसे दु:ख कोन , नसे न्यून कोणा |
फुलांना मुलांना , नसे दैन्य काही ||३||
जिजा माउली गे......

जशी पार्वती ती, प्रिया शंकरास
तशी प्रेरिका गे , शहाजींस तुही ||४||

जसा संविभागी ,बळी पूर्वकाळी |
शिवाजी जणांच्या , तसे चित्त्देहि ||५||
जिजा माउली गे....

तुझ्या संस्कृतीने ,तुझ्या जागृतीने |
प्रकाशात न्हाती , मने हि प्रवाही ||६||

तुला वंदिताना , सुखी अंग अंग |
खरा धर्म आता ,शिवाचाच पाही ||७||


खरा धर्म आता ,शिवाचाच पाही…
जिजा माउली गे... जय जिजाऊ , जय जिजाऊ...





सूचना :

ही वंदना कोणीही केव्हाही कुठेही स्मरण करू शकतात आपल्या पाल्याला वाचायला शिकवा त्यावर राजमाता जिजाऊ यांचे संस्कार घडवावे 

संकलित 

साभार 
शिव धर्म प्रसार साहित्य मंडळ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

नवीन लेख

कुठे गुंतवणूक करून मुलांचे भविष्य सुरक्षित करू

काळाने सर्वांना बदलवले, तसा बापही बदलला. आता कुटुंबात बापाची दहशत तेवढी उरलेली नाही, कारण आताचा बाप हा मुलांचा पहिला बेस्ट फ्रेंड झालेला आहे...

सर्वाधिक पसंतीस असलेले लेख :